
चाकरमान्यांना चौदा दिवसा ऐवजी सात दिवसाचा होम क्वारंटाईन ,येत्या दोन दिवसात घोषणा होणार
मुंबईकर चाकरमान्यांनी गौरी गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात कोकणात जाण्यास इच्छु क असून या चाकरमान्यांना चौदा दिवसा ऐवजी सात दिवसाचा होम क्वारंटाईन कालावधी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होणार आहे.
कोकणातील खासदारांनी मुख्यमंत्र्यांची दोन दिवसापूर्वी भेट घेवून या निर्णयासाठी आग्रह केला होता. या मध्ये खासदार विनायक राउत, खासदार अरविंद सावंत हे या वेळी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांबाबत सद्या कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने कोकणवासीय. अस्वस्थ आहेत. यापार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि खासदार यांनी आग्रही भूमीका घेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
www.konkantoday.com