कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा स्वॅब नमुना कोरोना पॉझिटिव्ह
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या त्रिशतकापार पोहोचली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्यात एकूण १६रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. एकूण रुग्णांची संख्या ३०७ वर पोहोचली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा स्वॅब नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचा स्वीय सहायकही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा त्रिशतकाकडे पोहोचला आहे.
आ. वैभव नाईक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती आणि त्यांचा स्वीय सहायक कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
www.konkantoday.com