कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात अडचणी
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात अडचणी उभ्या येऊन ठाकल्या आहेत. क्वारंटाइनचा कालावधी ठरत नाही, एसटी-रेल्वेची सेवा बंद आणि अशातच आता गावी जाण्यासाठी ई-पासही लवकर मंजूर होत नाही आहे. त्यामुळे चाकरमान्यांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांच्या वेबसाइटवर वैद्यकीय कारणांसाठी आणि अडकलेल्यांसाठी अशा दोनच कारणांसाठी ई-पासची व्यवस्था आहे. त्यामुळे नेमकं काय कारण द्यायचं असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे.
कोकणात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून लाखो चाकरमानी दरवर्षी या सणासाठी गावी जातात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कोकणात गणेशोत्सव साजरा करता येणार की नाही, असा प्रश्न समोर उभा ठाकला होता.एसटी सोडायची की नाही याबाबतही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. याशिवाय, आता क्वारंटाइन कालावधीवरून राजकारण रंगलं आहे. ऐनवेळी वाहतूक कोंडी तसंच इतर संकटांमध्ये अडकण्यापेक्षा चाकरमान्यांनी आतापासून गावाला जायची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी खासगी वाहनांचा पर्याय निवडला आहे. परंतु या मार्गातही त्यांना अडचणी येत आहेत.
www.konkantoday.com