राज्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून आधी सरकारी अधिकारी नेमा
राज्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यास काय अडचण आहे, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता.२२) राज्य सरकारला विचारला.
या पदांवर आधी सरकारी अधिकारी नेमा आणि हे अधिकारी न मिळाल्यास खासगी व्यक्तीची नेमणूक करा, पण त्यासाठी आधी लेखी सबळ कारण नोंदवा, असा अंतरिम आदेशही न्यायालयाने सरकारला दिला आहे. यावर येत्या २७ जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे
www.konkantoday.com