
रत्नागिरी आरोग्य मंदिर परिसरातील इमारतीत कोरोना रूग्ण सापडला, मात्र इमारत सील केली नसल्याचा भाजपा नेते संजय पुनसकर यांचा आरोप
रत्नागिरी शहरात विविध भागात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. रत्नागिरी आरोग्यमंदिर येथील तुबा कॉम्प्लेक्समध्ये एक कोरोना रूग्ण सापडला असून अद्यापही ही इमारत प्रशासनाने सील केली नसल्याने या परिसराला धोका उदभवू शकतो असे मत भाजपचे नेते व सामाजिक कार्यकर्ते संजय पुनसकर यांनी व्यक्त केले आहे. तीन दिवसांपूर्वी या इमारतीत कोरोनाबाधीत रूग्ण सापडल्याने या रूग्णाला तातडीने कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर ही इमारत प्रशासनाने सील करणे आवश्यक होते परंतु तसे येथे झालेले दिसत नाही. त्यामुळे इमारतीतील लोक सहजगत्या ये-जा करत सगळीकडे फिरत आहेत. याशिवाय या इमारतीत असलेले व्यावसायिकांची दुकाने, हॉटेल आदी चालू असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे. यासाठी प्रशानाने याची दखल घेवून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी पुनसकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांना माहिती दिली आहे त्यानी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे
www.konkantoday.com