
निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या धामणसे गावात अद्यापही जीओ कंपनीची मोबाईल सेवा विस्कळीत, ग्राहकांची गैरसोय
रत्नागिरी जिल्ह्यात ३ जून रोजी झालेल्या निसर्ग वादळाचा फटका धामणसे गावातील जोशीवाडी, गावडेवाडी, चौकेवाडी आणि बौद्धवाडी यांना बसला असून या ठिकाणी सध्या जीओच्या टॉवरचा संपर्क तुटल्याने मोबाईल यंत्रणा ठप्प झाली आहे. या परिसरात अंदाजे १७० घरे असून याठिकाणी टॉवर बंद असल्याने मोबाईलची रेंज नसल्याने ग्रामस्थांना अन्य भागात संपर्क करणे कठीण होवून बसले आहे. एकीकडे शासन प्राथमिक शाळा व अन्य शाळांतले शिक्षण ऑनलाईन करण्याच्या विचारात आहे परंतु या ठिकाणी इंटरनेटचे कनेक्शनच नसल्याने या परिसरातील मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रमाचा लाभ घेता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर जीओचा टॉवर चालू करून यंत्रणा पुर्ववत करणे गरजेचे आहे. या परिसरात जीओशिवाय दुसरा पर्याय नसल्याने लोकांना त्यावरच अवलंबून रहावे लागत असल्याने तातडीने लक्ष घालणे जरूरीचे आहे.
www.konkantoday.com