दापोलीत तातडीने उपजिल्हा रूग्णालयात डीसीसी सेंटर चालू करावे, भाजपचे सरचिटणीस केदार साठे
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दापोली तालुक्यातील दहा लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या सर्वाचा विचार करता दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात तातडीने डेडिकेटेड कोरोना (डीसीसी) सेंटर सुरू करणे आवश्यक असल्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी केली आहे. एखाद्या रूग्णाला श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी १७० कि.मी. प्रवास करून रत्नागिरीत पाठवावे लागत आहे. तसेच प्रवासाच्या दरम्याने व्हेंटीलेटरयुक्त रूग्णवाहिकांचीही कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. या सगळ्याचा विचार करता व संभाव्य मृत्यूदर कमी करण्याकरिता तातडीने दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात डीसीसी सेंटरला मान्यता मिळावी तसेच या ठिकाणी पाच व्हेंटीलेटर तातडीने मिळावेत अशी मागणी साठे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून केली आहे.
www.konkantoday.com