केंद्र सरकारनं भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा-,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा निर्णय अजूनही निकाली लागलेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगानं सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. मात्र, राज्य सरकारकडून परीक्षा न घेण्याची भूमिका मांडली जात आहे. याच भूमिकेवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोर दिला आहे. केरळमधील घटनेचा संदर्भ देत “केंद्र सरकारनं भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा,” असं आवाहन सामंत यांनी केलं आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. केरळमध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहीजणांना करोनाचा संसर्ग झाल्याच्या वृत्ताचा हवाला देत सामंत यांनी हे ट्विट केलं आहे.
www.konkantoday.com