
आता मास्कची सोबत करावीच लागणार तर मग आपला मनपसंत मास्क निवडा, रत्नागिरीतील पुष्कराज प्रिंटर्सची सुविधा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपली मास्कपासून सुटका होणार नाही हे निश्चित आहे. मग मास्क वापरायचा आहे तर तो आपल्याला आवडेल असा घ्यायला काय हरकत आहे. यासाठी रत्नागिरीतील पुष्कराज प्रिंटर्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रिंटेड मास्क उपलब्ध केले आहेत. हे मास्क त्यांनी ग्रामीण भागातील महिलांकडून बनवून घेतल्याने त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. असे मास्क ग्राहकाला पसंत पडले की त्यावर ग्राहकाच्या आवडीप्रमाणे पुष्कराज प्रिंटर्सकडून वेगवेगळ्या फोटोची छपाई केली जाते. आता व्यावसायिकांना सुद्धा आपल्या कर्मचार्यांना देखील मास्क घेणे आवश्यक असल्याने अनेक व्यावसायिक आपल्या व्यवसायाची व दुकानाची नावे त्यावर छापून घेत आहेत. याशिवाय अनेकजण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यानेही तेही आपल्या पक्षाची प्रतिमा या मास्कवर छापून घेत आहेत. याशिवाय इतर ग्राहकांना देखील आपल्या आवडीनुसार त्यावर फोटो छापून घेता येणे शक्य आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकर आपल्या आवडीचा मास्क यापुढे वापरू शकणार आहेत. याशिवाय हे मास्क वेगवेगळ्या रंगात असून त्याच्या किंमतीही किफायतशीर आहेत. www.konkantoday.com
