स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमार्फत जिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक केटल्स प्रदान
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेली दहा इलेक्ट्रिक केटल्स जिल्हा रुग्णालय प्रभारी डॉ. फुले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोव्हीड योध्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच वेळी स्वरूपानंद पतसंस्थेने इलेक्ट्रिक केटल्स जिल्हा रुग्णालयाला सुपूर्त केले. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी ईलेक्ट्रिक केटल्सचे दहा नग रुग्णालयाच्या गरजेनुसार डॉ. फुले यांच्याकडे सुपूर्त केले. याप्रसंगी स्वरूपानंद पतसंस्था जिल्हा रुग्णालयाच्या गरजेनुसार आवश्यक सहकार्य करण्यासाठी तत्पर राहील. कोरोनाच्या या संकटकाळात सर्वात महत्त्वाची सेवा शासकीय जिल्हा रुग्णालय देत आहे. सामाजिक जाणीव सदैव जागृत ठेवणारी स्वामी स्वरूपानंद पतसंस्था जिल्हा रुग्णालयामध्ये गरजेनुसार सहकार्य करेल असे अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले व जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय अन्य स्टाफ या सर्वांना ते करत असलेल्या अथक कामाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद दिले.
www.konkantoday.com