साखरीनाटे येथे कोरोना रूग्णांना आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचारी व पोलीस पथकावर जमावाचा हल्ला
रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचार्यांवर तसेच त्यानंतर आलेल्या पोलीस पथकावर काही लोकांनी हल्ला केल्याची घटना साखरी नाटे परिसरात घडली आहे साखरीनाटे येथे सोमवारी दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले होते. पैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावातील आणखी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर या रूग्णाला आणण्यासाठी आरोग्य कर्मचार्यांचे एक पथक रूग्णवाहिका घेवून गेले होते परंतु तेथे जमलेल्या लोकांनी त्याला विरोध सुरू केला व रूग्णाला नेण्यास विरोध केला. त्यामुळे आरोग्य कर्मचार्यांनी पोलिसांची मदत घेतली. घटनास्थळी पोलीस आल्यानंतरही जमावाने आपले म्हणणे सोडले नाही. जमावाने कर्मचारी व पोलिसांवरही हल्ला केला व शासकीय वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये पोलिसांच्या गाडीच्या काचा तुटल्या आहेत. तसेच यामध्ये एका आरोग्य कर्मचार्यालाही दुखापत झाल्याचे कळत आहे. गावागावात कोरोना रूग्ण सापडत असल्याने चिंतेचे वातावरण असताना कोरोना योध्द्याचे काम बजावणार्या यंत्रणेवरच हल्ले होत असल्याने आता चिंतेचे वातावरण बनले आहे.
www.konkantoday.com