
विरोधी पक्ष नेत्यांनी बोलावलेल्या बैठकांना, दौऱ्यांना अधिकाऱ्यांनी उपस्थीत राहू नये – शासनाचा आदेश
कोविड रुग्णालयांना भेटी देणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यांना राज्य सरकारने ब्रेक लावला आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे. यानूसार विधानसभा, विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना बैठका बोलावण्याचा अधिकार नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी बोलावलेल्या बैठकांना, दौऱ्यांना अधिकाऱ्यांनी उपस्थीत राहू नये असा आदेशच या परिपत्राकातून देण्यात आला आहे. केवळ मंत्र्यांना शासनाच्या प्रशासकीय कामावर लक्ष ठेवणे, अधिकाऱ्यांच्या बैठका बोलावणे, सूचना देण्याचा अधिकार असल्याचे या परित्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र जिल्ह्यातील संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील सार्वजनिक महत्वाचे प्रलंबित प्रश्नासंदर्भात बैठक बोलावयाची असेत, तर जिल्हाधिकाऱ्यांनी या सदस्यांकडून प्रलंबित प्रश्नांची यादी मागावी. आणि संबधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवावी असही या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
www.konkantoday.com