
भाटे समुद्र किनारी अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला
रत्नागिरी शहराजवळील भाटय़े समुद्र किनारी आज सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे भाटय़े समुद्र किनारी सकाळी अनेक लोक वॉकिंगसाठी जात असतात त्यांना हा मृतदेह दिसला याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यावर घटनास्थळी येऊन पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला मृतदेह पुरुषाचा असून वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष असल्याचे कळते हा मृतदेह वाहत भाटे समुद्र किनाऱयाला आला असावा अंदाज आहे या मृतदेहाचे आता पोस्टमार्टम करण्यात येणार आहेत या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही
www.konkantoday.com