डोक्यात लोखंडी रॉड मारून रक्कम चोरून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी रेल्वे स्थानकात पडक्या इमारतीत झोपलेल्या संदीप यादव याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याच्याजवळील रक्कम पळविणारा आरोपी अर्जुन कलाप्पा पवार याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेवून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. संदीप यादव हे रेल्वे स्टेशननजिक अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत झोपले असताना त्या ठिकाणी आरोपी अर्जुन पवार आला व त्याने आपल्या हातातील लोखंडी रॉडने संदीप यादव यांना मारहाण करून त्यांच्याजवळील दोन हजार रुपयांची रक्कम पळवली होती. या प्रकारानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार केले होते. या पथकांनी आरोपी अर्जुन याचा शोध घेवून त्याला अटक करून पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. ही कामगिरी अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बोरकर, मिलिंद कदम, सुभाष भागणे, शांताराम झोरे, राकेश बागुल, नितीन डोमणे, पोलीस नाईक अरूण चाळके, रमीझ शेख यांनी पार पाडली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button