
घरडा केमिकल बंद करण्याच्या विरोधात घरडा कामगार संघटना आक्रमक
संपूर्ण देशामध्ये बिगिन अगेन सुरू झाले आहे. कोठेह कारखााने बंद करण्यात आलेले नाहीत. किंबहुना कारखाने चालू करावे म्हणून सर्व राज्यांचे शासन आग्रही आहेत असे असतानाही घरडा कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले याचा घरडा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष घोरपडे व सचिव दत्ताराम घाग यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. घरडा कंपनी कायम कामगारांचे हित पहात आली आहे. चांगल्या कामामुळेच डॉ. घरडा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. चिपळूण-खेड परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कंपनीत आहेत. कंपनीने आपल्या व कंत्राटी कामगारांच्या सामाजिक बांधिलकीतून १०० टक्के कोविड चाचण्या केल्या म्हणून कोरोना पॉझिटीव्हची संख्या मिळत आहे. घरडा कंपनी ही एकमेव कंपनी आहे की ज्यांनी स्वतःच्या कंत्राटी कामगारांचा व कंत्राटदारांच्या कामगारांचाही पगार दिला आहे. अशा कंपनीच्या उत्पादनाला कोविडच्या कचाट्यात अडकविण्याचा प्रयत्न काही कामगार हितविरोधी लोकांकडून होत आहे. याला ताबडतोबीने आळा घाला व त्वरित कंपनी सुरक्षिततेची काळजी घेवून चालू करावी अशी मागणी घरडा कामगार संघटनेने केली आहे.
www.konkantoday.com