गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे व कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू करा-कोकण रेल्वे समन्वयक समितीची मागणी

करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे व कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात. अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो, होळी आणि गणपतीला गावी जातोच, हे सर्वश्रुत आहेया वर्षी करोनाच्या साथीमुळे काही नागरिक आधीच गावी गेले आहेत. त्यामुळे यावर्षी गणपतीत गावी जाणाऱ्यांची संख्या कमी असली, तरीही गावची घरे संपूर्ण बंद असणे, सर्व नातेवाईक बाहेरगावी असणे या व इतर काही कारणांमुळे बऱ्याच नागरिकांना गावी जाणे भाग आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
कोकण रेल्वे समन्वयक समितीचे अध्यक्ष डी. के. सावंत, कार्याध्यक्ष नितीन गांधी, सचिव अक्षय महापदी व खजिनदार रमेश सावंत यांनी मागणी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button