
विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादात एआयसीटीईने यूजीसीचे समर्थन केले
विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) समर्थन केले आहे. ‘आयोगाच्या सूचनेनुसार तंत्रशिक्षण संस्थांनी परीक्षा घ्याव्यात, अशी सूचना संस्थांना केली आहे,’ असे प्रतिज्ञापत्र ‘एआयसीटीई’ने उच्च न्यायालयात दाखल केले आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेत ‘एआयसीटीई’ने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तंत्रशिक्षण संस्थांनी ‘यूजीसी’च्या सूचनेनुसार परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे ‘एआयसीटीई’ने स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com