
*खेड बसस्थानकात मद्यधुंद चालकाच्या हाती स्टेअरिंग*
__एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या जीविताशीच सुरू असलेला खेळ अद्यापही कायमच आहे. बुधवारी रात्री १० वा. खेडयेथील बसस्थानकातून सुटणार्या खेड-बोरीवली बसचे स्टेअरिंग चक्क मद्यधुंद चालकाच्या हाती दिल्याचा प्रकार उघडकीस आला. बसस्थानकातील फलाटालगतच्याा भिंतीला बस धडकल्यानंतर चालक मद्यधुंद असल्याचे निदर्शनास आले. यामुळे मोठा अनर्थ टळला. मद्यधुंद अवस्थेतील मंगेश आहाटी या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.लांब पल्ल्यासह ग्रामी भागात बस घेवून जाणारे बहुतांश चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. मद्यधुंद चालकांमुळे प्राणांतिक अपघातांसह छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. या सार्या घटना घडून देखील एसटी प्रवाशांकडून मात्र अजूनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. www.konkantoday.com




