
खेड येथील चोरी प्रकरणात दोन चोरटे अटकेत
खेड शहरातील स्वरूपनगर येथील गोकुळ अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून ४ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या ऐवजासह एक दुचाकी चोरणार्या मध्यप्रदेशच्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केले.
सुनिल लालसिंग मुझालदा (२३, रा. मध्यप्रदेश), रवी उर्फ छोटू मोहनडावर (१९, रा. मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
www.konkantoday.com