
खेडतालुक्यातील लवेल येथील भागात एका घरात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरफोडी करून सुमारे ७९ हजार ३९५ रुपयांच्या केला ऐवज लंपास.
खेड. तालुक्यातील लवेल येथील भागात एका घरात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरफोडी करून सुमारे ७९ हजार ३९५ रुपयांच्या चांदीचे दागिने आणि सोन्याच्या शिकळ्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना १५ जुलैच्या रात्री १० वाजल्यापासून १६ जुलैच्या दुपारी २.५४ या कालावधीत घडली. अंबरनाथ, कल्याण येथे वास्तव्यास असलेले अमित कुमार मनोहर सागवेकर यांचे खेड तालुक्यातील लवेल येथे घर आहे. या बंद घराच्या कंपाउंडवरील लोखंडी गेटचे स्टील लॉक अज्ञात चोरट्यांनी कोणत्यातरी धारदार हत्याराने कापून टाकले.यानंतर चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्यावरील पितळी कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन नंबरच्या बेडरूममधील लोखंडी कपाट, लाकडी टेबल आणि देवघरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील चांदीचे दागिने, सोन्याच्या शिकळ्या व इतर मौल्यवान वस्तू चोरून नेण्यात आल्या.या चोरीप्रकरणी १७ जुलै २०२५ रोजी रात्री ११.०८ वाजता खेड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.