
त्या कर्मचाऱ्याच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती -परिवहन मंत्री अनिल परब
करोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक आघाडीवर अनेक प्रश्न निर्माण झाले असून, आर्थिक भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं मागील वर्षी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र, हे वृत्त राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी फेटाळून लावलं आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. “करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील
www.konkantoday.com