ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती वादात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उडी
ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याबाबत सध्या वाद सुरू असून आता या वादात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली असून त्यांनी याबाबत काढण्यात आलेले परिपत्रक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. प्रशासकाची नियुक्ती करताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा ही तरतूद घटनाबाह्य असल्याचेही हजारे यांनी म्हटले आहे. या निर्णयात बदल झाला नाही तर आपल्याला आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
www.konkantoday.com