कुडाळ मालवण विधान सभा मतदार संघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण

कुडाळ मालवण विधान सभा मतदार संघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असतानाच सोमवारी रात्री आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आम वैभव नाईक हे या कोरोनाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः कुडाळ आणि मालवण या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात नेहमी प्रवासात असतात. त्यांचा सिंधुदुर्गनगरी मध्येही विविध बैठकांसाठी प्रवास असतो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button