वाशिष्ठी पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी -प्रशांत यादव
मुंबई-गोवा महामार्गावर बहाद्दूरशेख नाका ते कळंबस्ते दरम्यान असणारे वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पुलांची मुदत संपल्याने ते कालबाह्य झाले आहेत. या पुलावरून अवजड वाहतूक करताना हे पुल हलतात. पुलाच्या खालचा स्लॅबही उखडला आहे. सध्या कोकणात पाऊस खूप आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने पावसाळ्याच्या हंगामात या पुलावरील अवजड वाहतूक बंद करून धोका टाळावा अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी एका निवेदनाद्वारे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com