लाखो रुपये खर्चुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरेश्वर येथे समुद्रकिनारी एमटीडीसीची वूड हाऊस सुरू होण्याआधीच कोलमडले
कोकणात येणार्या पर्यटकांना समुद्रकिनारी निवास करून निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे सागरेश्वर किनारी महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळाने किनार्यावर वूड हाऊस उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्या ठिकाणी लोखंडी अँगल व लाकडाचा वापर करून लाखो रुपये खर्च करून वूड हाऊस उभारण्याचे काम सुरू झाले होते. गेले दोन वर्षे हे काम सुरू होते. व त्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे व लाटांच्या जोरामुळे त्या वूड हाऊसचा पाया ढळण्यास सुरूवात झाली आहे. व वूड हाऊसचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com