रत्नागिरी जिल्ह्यात आता गवारेडे रस्त्यावर येऊन दर्शन देऊ लागले
दाट जंगलात आढळणारे गव्यारेडय़ांचे आता रस्त्यावर दर्शन होऊ लागले आहे काेराेनामुळे जिल्हा बंदी असल्याने सध्या रस्त्यावरील रहदारी कमी झाली आहे त्यामुळे अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन होत आहे मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी येथे गव्यारेडय़ाच्या कळपाचे दर्शन झाले हे रेडे जवळच्या जंगलातून आले असावेत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर लांजा आदी परिसरात मधून मधून गवा रेड्यांचे दर्शन होते परंतु आता कळपाने दर्शन होऊ लागले आहे
www.konkantoday.com