
राजापूर तालुक्यातील ओणी येथे ट्रकच्या धडकेत कारमधील तीनजण जखमी
राजापूर तालुक्यातील ओणी येथे भरधाव ट्रकने एका थांबलेल्या कारला धडक दिल्याने तीनजण जखमी झाले. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी १.१५ वाजता ओणी गावातील पेट्रोल पंपाच्या समोर घडली. याप्रकरणी टक चालक शिहाबुद्दीन राउतार (४३, केरळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश रविदास नायक (४५, रा. डोंबिवली, ठाणे) हे पत्नी आणि मुलीसह मूळगावी उडपी (कर्नाटक) येथे गेले होते.
तेथून गोवा-मुंबई मार्गे डोंबिवलीला परतत असताना ओणी येथे त्यांनी रस्त्यावर गाडी थांबवली. त्यांची पत्नी आणि मुलगी गाडीत बसून निघणार होत्या, त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रक चालकाने समोरच्या ट्रकला ओव्हरटेक करताना कारला धडक दिली. या अपघातात सतीश नायक यांना मार लागला. त्यांच्या पत्नी कात्यायनी यांच्या डोक्याला, चेहर्याला तर मुलगी समीक्षा हिच्या कमरेला मुका मार लागला. www.konkantoday.com