
बोरवली-रत्नागिरी – हर्चे बस रस्ता सोडून बाजूच्या दरीत गेली
बोरिवली येथून रत्नागिरी हर्चे गावाकडे जाणारी एसटी बस आज सकाळी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने रस्ता सोडून बाजूच्या दरीत गेली सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे कळते हा अपघात रत्नागिरी हर्चे रोडवर शेळवी स्टॉपजवळ घडला या अपघातामुळे पूर्ण रस्ता बंद झाला आहे.
सदर बस शेळवी स्टॉप जवळ उतारावरून समोरच्या दरीत जाऊन अडकली ड्रायव्हरने स्टॉपवरती न जाता हर्चेच्या दिशेने जाण्यासाठी टर्न घेताना गाडी दरीमध्ये गेली.
www.konkantoday.com
