फेसबुक साईटवरून कॅमेरा विकत घेताना गुहागर येथील तरूणाची फसवणूक, ३८ हजार रुपयांना गंडा
फेसबुक साईटवरून पसंत पडलेला कॅमेरा घेण्यासाठी ऑनलाईन पैसे भरणारा सिद्धेश कोळंबेकर (रा. साखरी गुहागर) या तरूणाची आरोपी महेंद्र मालविया व अरविंदकुमार नावाच्या दोन इसमांनी फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील सिद्धेश याने फेसबुक साईटवरून कृष्णाकुमार पेजवर १८ हजार रुपयांत कॅमेरा ही जाहिरात पाहिली होती. हा कॅमेरा त्याला पसंत पडल्याने त्यासंबंधी दिलेल्या मोबाईलवर संपर्क केला असता समोरच्या व्यक्तीने आपले नाव महेंद्र मालविया असे सांगून कॅमेर्याच्या किंमतीचे पैसे ऑनलाईन भरण्यास सांगितले. सिद्धेश याने आपल्या मित्रांच्या अकाऊंटमधून ३७ हजार ७२८ रुपये भरले. परंतु पैसे भरल्यानंतरही आरोपीनी त्याला कोणताही कॅमेरा न पाठवता त्याची फसवणूक केली म्हणून आरोपींविरूद्ध गुहागर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com