
पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून आज 20 जुलै पासून दैनंदिन मालिकेद्वारे शिक्षण
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही कोणतेही क्षेत्र पुर्णपणे चालू केली नाहीत. मुलांच्या शाळाही अजून बंद आहेत. त्यामुळे किती दिवस असं चालणार कारण परीक्षा रद्द करून सर्वांना पुढील वर्गाच प्रवेश दिला. पण आता चालू वर्ग कधी भरणार याची प्रतीक्षा पालकांनाही लागली आणि विद्यार्थ्यांनाही. या दरम्यान अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनीवरून 20 जुलै पासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जाणार आहे आणियत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
www.konkantoday.com