डॉ. कैलास वैद्य यांचा उन्मळून पडलेल्या झाडांना परत एकदा उभे करण्याचा प्रायोगिक तत्वावर प्रयोग
निसर्ग वादळात उन्मळून पडलेल्या हापूस आणि केशर कलमांच्या झाडांचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयोग डॉ. कैलास वैद्य करीत आहेत. ही झाडे पुर्वीप्रमाणे मजबुतीने उभी राहतात का, त्यांना पुर्वीप्रमाणे फळधारणा होते का यावर या प्रयोगाची यशस्वीता ठरणार आहे. त्यासाठी किमान ५ वर्ष वाट पहावी लागणार आहे.
जूनमध्ये झालेल्या निसर्ग वादळात नरवणमधील डॉ. कैलास वैद्य यांच्या बागेतील ४१ काजू कलमे आणि ७८ आंबा कलमांचे नुकसान झाले. या झाडांपैकी काही झाडे उन्मळून पडली होती. यातील मोजकी झाडे प्रयोगासाठी कैलास वैद्य यांनी निवडली. या झाडांच्या फांद्या त्यांनी तोडल्या. तोडलेल्या ठिकाणी बुरशी येवू नये म्हणून औषध लावले. तेथून झाडांच्या खोडात पाणी जावू नये म्हणून प्लास्टीकचा कागद बांधला. त्यानंतर ते झाड उन्मळून पडलेला खड्डा रूंद करून सदर झाड पुन्हा त्या खड्ड्यात उभे केले. या खड्ड्यात माती घालताना झाडाची मुळे मजबूत होण्यासाठी खताचा वापर केला आहे. तसेच उन्मळून पडलेले झाड पुन्हा कोलमडू नये म्हणून दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com