आरोग्य सेवकांचेच कोरोना रिपोर्ट मागील पाच दिवसांपासून आले नाहीत
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. परंतु, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य सेवकांचेच कोरोना रिपोर्ट मागील पाच दिवसांपासून आले नसल्याची बाबसमोर आली आहे.
गुहागर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांचे कोरोना चाचणीसाठी घेतलेले स्वॅब रिपोर्ट आज ५ दिवस झाले तरी अहवाल न आल्याने आरोग्य कर्मचारी वर्गातून नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये दोन महिला कर्मचारी व आरोग्य सेवक पुरुष आहे.
www.konkantoday.com