रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 52 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह 1262,ॲक्टीव्ह रुग्ण 472
रत्नागिरी दि. 20 (जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 52 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1262 झाली आहे. दरम्यान 23 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 749 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड केअर सेंटर , पेढांबे 7, कोव्हीड केअर सेंटर देवधे,लांजा 5, पाचल, रायपाटण 4 आणि 7 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – 5 रुग्ण
घरडा, खेड 22 (यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 132 झाली)
उपजिल्हा रुग्णालय, कामथे १४
दापोली ५
लांजा ६
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1262
बरे झालेले – 749
मृत्यू – 41
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 472
सध्या ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 472 आहे. आज मौजे फणसोप सडा परिसर, रत्नागिरी, मिरकरवाडा, रत्नागिरी, पोलीस वसाहत, रत्नागिरी, मौजे वाटद, खंडाळा, रत्नागिरी, आशीर्वाद अर्पाटमेंट, माळनाका, रत्नागिरी, मौजे नाचणे नरहरवसाहत, रत्नागिरी, नर्सिंग हॉस्टेल, गोगटे कॉलेज ग्राऊंड शेजारी, रत्नागिरी, मयुरेश्वर कॉम्प्लेक्स,आयटीआय हॉस्टेल समोर, नाचणे, रत्नागिरी, मौजे जुवे, रत्नागिरी, मौजे जयगड, रत्नागिरी, मौजे कुणबीवाडी कसोप, रत्नागिरी, मौजे भगवतीनगर भूतेवाडी, रत्नागिरी, मौजे शेटयेवाडी शिरगाव, रत्नागिरी, सनराईझ रसिडेन्सी,आझादनगर, मजगाव रोड, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
तसेच मौजे जेलरोड,रत्नागिरी, मौजे राजिवडा, रत्नागिरी, मारुती मंदीर, रत्नागिरी, चर्मालय, रत्नागिरी, साळवी स्टॉप, रत्नागिरी, उद्यमनगर, रत्नागिरी, शिवाजीनगर, मजगाव रोड, रत्नागिरी, मौजे नाचणे समर्थनगर, रत्नागिरी, मौजे गणेशगुळे, रत्नागिरी, मौजे शिरगाव तिवंडेवाडी, रत्नागिरी, मौजे मिरजोळे, रत्नागिरी, मौजे भाट्ये, रत्नागिरी, मौजे कारवांची वाडी, रत्नागिरी, मौजे निवळी, रत्नागिरी, मौजे कोतवडे धामेलेवाडी, रत्नागिरी, मौजे वेळवंड, रत्नागिरी या भागात कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सीमा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (दि. 19 जुलै 2020 पर्यंत)
जिल्ह्यात सध्या 84ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 23 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 6 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 56, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 14, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 7, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी – 4, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 2, ग्रामीण रुग्णालय गुहागर-1, केकेव्ही, दापोली – 30 असे एकूण 115 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 14 हजार 578 इतकी आहे.
12 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 14 हजार 158 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 13 हजार 724 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1262 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 12 हजार 462 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 434 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 434 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 19 जुलै 2020 अखेर एकूण 1 लाख 94 हजार 637 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 99 हजार 483 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 20 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.
0000