ज्या कोणत्या काँग्रेस नेत्याने हा आरोप केला आहे त्याची आधी मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्या-देवेंद्र फडणवीस
राजस्थानात सत्तासंघर्ष घडवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी ५०० कोटी जमवले असा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्याला चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सचिन सावंत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेतमहाराष्ट्र भाजपावर ज्या कुणी राजस्थान नाट्यासाठी ५०० कोटी जमवल्याचा आरोप केला आहे तो कुणी लावला मला मला ठाऊक नाही कारण मी दिल्लीत होतो. पण ज्या कोणत्या काँग्रेस नेत्याने हा आरोप केला आहे त्याची आधी मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्या. प्रसिद्धीसाठी काँग्रेसचे नेते काहीही बडबड करतात. यांचे आरोप कुणाला खरे वाटणार? असं कुठे घडतं का? खरंच मला वाटतं की ज्या काँग्रेस नेत्याने हा आरोप लावला आहे त्याला चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे.”
www.konkantoday.com