
जिल्ह्यात कोरोनाच्या विळख्यात आरोग्य कर्मचारी व डॉक्टर
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच चिंतेचा विषय म्हणजे त्यामध्ये आरोग्यसेवा बजावणार्या कर्मचारी व डॉक्टराना कोरोनाची लागण होत आहे. रत्नागिरीत २४ तासात सापडलेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये डॉक्टर, आरोग्य सहाय्यक, जेल पोलीस आदींचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील दापोली येथेही एका डॉक्टर पती-पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे तर संगमेश्वर व लांजा येथेही एका खाजगी डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेतील लोकांच्यात कोरोना पसरत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
www.konkantoday.com