खेर्डी थ्री एम पेपर मिल कामगार वादावर पडदा -आ. राजन साळवी यांची यशस्वी मध्यस्थी
आपण चिपळुणात येवून त्या परप्रांतीय कामगारांना बाहेर काढून नंतर कंपनीतही घुसणार अशा शब्दात आ. राजन साळवी यांनी सुनावले आणि आ. भास्करशेठ जाधव यांनी हा विषय उचलून धरला त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी रातोरात चिपळूणमध्ये एसआरपीची तुकडी मागवण्यात आली परंतु डीवायसपी नवनाथ ढवळे यांनी आपली कार्यतत्परता दाखवून दिली. खेर्डी येथील स्थानिक पदाधिकारी आणि कंपनी प्रशासन यांच्याकडे सलग बैठका घेवून अखेर तोडगा काढला. आता थ्री एम पेपर मिलमध्ये सर्वप्रथम स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल व नंतर बाहेरचे कामगार घेतले जातील असे सांगण्यात आले.
www.konkantoday.com