
रत्नागिरी परिसरातील मारूती मंदिर येथील महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी मेघना शहा
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या रत्नागिरी परिसरातील मारूती मंदिर येथील महिला मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी मेघना बिपिन शहा यांची निवड करण्यात आली.मंडळाच्या वार्शिक सभेत २०२४ ते २०२६ या तीन वर्षासाठी ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून अनुराधा कयाळ, सचिव डॉ. राखी लांजेकर, खजिनदारपदी आरती पाध्ये यांची निवड झाली. सहसचिवपदी स्तीमिता तलाठी व सहसेक्रेटरी गीता वैद्य यांची निवड झाली. सदस्यपदी मोहिनी पटवर्धन, सुरेखा खेर, सुप्रिया बेडेकर, अमृता कयाळ, आदिती पटवर्धन, पूर्वा साने, कल्याणी पटवर्धन यांची निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून शिल्पा पानवलकर व दीप्ती पंडित यांची निवड करण्यात आली.www.konkantoday.com