
निसर्ग पर्यटनासाठी आंजर्ले, सोनगाव, गावखडी या गावांची निवड
कांदळवन उपजिवीका निर्माण योजनेंतर्गत निसर्ग पर्यटनासाठी दापोली तालुक्यातील आंजर्ले, खेड तालुक्यातील सोनगाव, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी या गावांची निवड केली आहे. यामध्ये मरीन वाक, कांदळवन सफारी, क्रोकोडाईल सफारी, पक्षी निरिक्षण, तारे निरिक्षण आणि कयाक बोटींग या सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये स्थानिकांना रोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कांदळवन कक्षामार्फत कांदळवन उपजिवीका निर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये शोभिवंत मत्स्यपालन हा प्रकल्प रत्नागिरी जिल्हातील सहा गावांमध्ये करण्यात येणार आहे. नऊ युनिट सुरु करण्यात येणार असून प्रत्येक युनिटसाठी ४,११,५००रुपये निधी दिला जाणार आहे.
www.konkantoday.com