अंतिम वर्षाच्या परीक्षा, महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंबंधितच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र कोर्टाने अद्याप याचिका सुनावणीसाठी दाखल केलेली नाही. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी कोरोना व्हायरसच्या काळात परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता. त्याचप्रमाणे परीक्षा घेऊन ९ लाख विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आणणे सरकारला उचित वाटत नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले होते.
www.konkantoday.com