सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीजच्या कार्यालयातून ६लाखाची चोरी
सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीच्या जुन्या ऑफिसमधून तिजोरीमधून ६ लाख रुपये चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे
ह्याबाबत फिर्यादी सचिन गुरव यांनी सावर्डे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे फिर्यादी हे सचिन कात इंडस्ट्रीमध्ये गेली दहा वर्षे कॅशिअर म्हणून काम करीत आहेत कात कंपनीच्या व्यवहारातून जमा झालेली रक्कम त्यांनी जुने ऑफिसमधील तिजोरीत ठेवली होती ही रक्कम अज्ञात चोरट्याने कोणत्या तरी चावीचा वापर करून एकूण सहा लाखांची रक्कम चोरून नेली हा चोरीचा प्रकार उघड झाल्यावर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे
www.konkantoday.com