
मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार यांनी पुढाकार घेतल्याने दुबईत अडकलेले १८६ गोरगरीब कामगार महाराष्ट्रात
लॉकडाऊनमुळे दुबईत अडकलेले १८६गोरगरीब कामगार सुखरूप आपल्या महाराष्ट्रात परतले आहेत. ‘मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार यांनी पुढाकार घेऊन या कामगारांना महाराष्ट्रात परतण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केल्यामुळे त्यांची अखेर घरवापसी झाली आहे.
कोरोनाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातुन-दुबईसारख्या देशात कामासाठी गेलेले अनेक गोरगरीब कामगार लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर या कामगारांच्या परतीचा सर्व खर्च डॉ. दातार यांची अल अदील ट्रेडिंग कंपनी करीत आहे. यामध्ये १८६ महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे.
www.konkantoday.com