जयगड जवळ खोल समुद्रात उभ्या असलेल्या जहाजावरील इंजिन रुमला आग ,एकाचा मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे खोल समुद्रात उभ्या असलेल्या सिरेस्टीअर शिप मॅनेजमेंट पीटीई या जहाजावरील इंजिन रूमला लागलेल्या आगीच्या भडक्यात गंभीर जखमी झालेला हरबिदर कर्नल सिंग (२९)राहणार हिमाचल प्रदेश याचा मृत्यू झाला
जयगड येथे खोल समुद्रात उभ्या असलेल्या सिरेस्टीअर शिप मॅनेजमेंट पीटीई या जहाजावरील इंजिन रुममध्ये हरबिदर कर्नल सिंगहा जहाजावर आयलर म्हणून काम करीत होता अचानक जहाजावरील इंजिन रूममध्ये बिघाड होऊन आग लागली व आगीचा भडका उडाला त्यामध्ये हरबिंदर हा गंभीर जखमी झाला तिच्यावर जहाजावर प्राथमिक उपचार सुरू असताना तो मृत्युमुखी पडला याबाबत जयगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button