ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूका निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
कोरोनाच्या काळात राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका खोळंबल्या आहेत. या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्याचा अध्यादेश नुकताच देण्यात आला. पालकमंत्र्याच्या सल्ल्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशासकाच्या नेमणूकीचे आदेश यानुसार देण्यात आले आहेत. मात्र शासनाच्या या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
आज याविषयी तातडीनं सुनावणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘सरपंच ग्रामसंवाद महासंघानं अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याबाबत रिट याचिका दाखल केली आहे
www.konkantoday.com