
विषारी प्राण्याच्या दंशाने पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील मांजरे कलकादेवी कोंड येथील राहणारी अनुष्का विजय देसाई (१५) या मुलीच्या मनगटाला विषारी प्राण्याने दंश केल्याने तिचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू झाला. अनुष्का ही आपल्या घरात झोपली असता झोपेत कोणत्या तरी विषारी प्राण्याने तिच्या डाव्या मनगटाला दंश केला. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली. तिला तातडीने रत्नागिरीत खाजगी रूग्णालयात आणण्यात आले त्यानंतर तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू झाला.
www.konkantoday.com