मिरजोळे येथील दूध संकलन केंद्राला अनुदान न आल्याने केंद्र बंद
रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीत असलेले शासकीय दूध संकलन केंद्राला बर्फ खरेदीसाठी शासनाकडून अनुदान न आल्याने केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. तर यापूर्वी दोन वर्ष खरेदी केलेल्या बर्फाचे सुमारे ३५ लाखांचे बिल अद्याप थकित असल्याने बर्फ खरेदी अडचणीत आली आहे. त्यामुळे ऐन लॉकडाऊनमध्ये दूध संकलन केंद्र बंद पडले आहे. याचा परिणाम दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्यांवर झाला आहे. तरीही जिल्ह्यातील प्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नसल्याचे कळते.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात शासकीय दूध संकलन होत नाही. गावागावात काही शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. नियमितपणे दूध देणार्यांची संख्या काही हजारात आहे. प्रतिदिन ४,२०० लिटरच्या दरम्यान दूध जमा केले जाते. हे संकलन सोसायटीच्या माध्यमातून होते. दूध संघ नसल्यामुळे शासकीय संकलन केंद्राचा या शेतकर्यांना आधार आहे.
www.konkantoday.com