बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग पुन्हा आघाडीवर
राज्य शिक्षण मंडळाचा १२वीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. नेहमीपेक्षा सुमारे दीड महिना उशिरा हे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यभर १२वीच्या निकालांची आकडेवारी ९०.६६ टक्के इतकी झाली आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर कला शाखेचा निकाल ८२.६३ टक्के इतका लागला आहे. याही वर्षी कोकण विभागाने १२वीच्या परीक्षांमध्ये आघाडी घेतली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के इतका लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.१८ टक्के इतका लागला आहे.
रत्नागिरी वैभव
विभागवार निकाल –
पुणे- 92. 50टक्के,
नागपूर- 91.65 टक्के,
औरंगाबाद- 88.18 टक्के ,
मुंबई – 89.35 टक्के
कोल्हापूर- 92.42 टक्के,
अमरावती- 92.09 टक्के,
नाशिक- 88.87 टक्के,
लातूर- 89.79 टक्के,
कोकण- 95 .89 टक्के
कोकण विभागच निकाल सर्वाधिक एकूण 90.66 टक्के….मागील वर्षीच्या तुलनेत 4.78 टक्के वाढ
निकाल पाहण्यासाठी
http://www.maharashtraeducation.com
http://www.hscresult.mkcl.org