निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकणाचे तब्बल सहा हजार कोटींचे नुकसान
निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकणाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून कोकणाचे तब्बल सहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका वीजपुरवठा आणि फळबागांना बसला आहे. चक्रीवादळग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला त्यानुसार केंद्र सरकारकडे राष्ट्रीय आपत्ती निधीतून ११०० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com