
नरबे-रानपाट येथील पुलाच्या कमी उंचीमुळे पावसाळ्यात वाहतूक करणे धोकादायक
रत्नागिरी तालुक्यातील नरबे-रानपाट पुलावर बांधण्यात आलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नदीला येणार्या पुरामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक होत आहे. अनेकवेळा मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी वाढल्यावर पुलावर पाणी येते. त्यामुळे हे पाणी ओसरेपर्यंत ग्रामस्थांना ये-जा करता येणे अशक्य बनले आहे. या पुलावरून भातगाव, फुणगुस, परचुरी, उक्षी, रानपाट या गावात जाणार्या ग्रामस्थांची ये-जा असते. सध्या या पुलाच्या रस्त्याला खड्डे पडले असून पुलाचे कठडेही अद्याप उभारलेले नसल्याने पुल वाहतुकीला धोकादायक ठरत आहे.
www.konkantoday.com