ग्रामपंचायतीवर प्रशासक बसवण्याचा निर्णय त्वरित मागे घ्या – सुधीर मुनगंटीवार
ग्रामपंचायतीवर प्रशासक बसवण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्य शासनाने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा अन्यथा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कोवीड-19 च्या संकटाच्या काळात वित्त आयोगाचा मोठा निधी ग्रामपंचायतींना दिला गेला. तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांची, पदाधिका-यांची नेमणूक प्रशासक म्हणून तिथे व्हावी यासाठी हा काळा अध्याादेश सरकारने काढला गेला आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.
www.konkantoday.com