कोकण बोर्डाने बारावी परीक्षेत मिळवले अव्वल स्थान
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने परत एकदा जोरदार कामगिरी करून सलग नवव्या वर्षी सर्व बोर्डात अव्वल स्थान पटकावले. यावर्षी रत्नागिरी विभागाचा निकाल ९५.८९ टक्के लागला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळून २४४ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२० टक्के आहे तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.४० टक्के आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.५७ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९७.८९ टक्के व कला शाखेचा निकाल ९०.८ टक्के लागला.
कोकण विभागाकडे छायाप्रतीसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील तर ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करावयाची आहे त्यासाठी १७ जुलै ते २७ जुलै ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावयाचे आहे.
www.konkantoday.com